विद्या प्रसारिणी शाळेच्या दोन
विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धांत यश
पूर्णा : विद्या प्रसारिणीच्या आयुष काळे व श्रेयस डाके या दोन खेळाडूंची छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या शालेय विभागीय मल्लखांब स्पर्धेसाठी तर विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी सुदर्शन तुकाराम खंदारे याची निवड झाली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा मल्लखांब असोसिएशन परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने परभणीत आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेत विद्या प्रसारिणी सभेचे हायस्कूलच्या आयुष अनिल काळे, श्रेयस विनोद डाके या खेळाडूंनी यश संपादन केले. या खेळाडूंची शालेय विभागीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी सुदर्शन तुकाराम खंदारे याची निवड झाली आहे.
तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत याच विद्यालयाच्या १७ वर्षा खालील मुलांच्या संघाने यश संपादन केले आहे. त्यात सर्वेश विवेक कोंडेकर, मन्मथ सुभाष अफुने, तुषार सुरेश वैद्य, सार्थक मुकुंदराव मोरे यांचा समावेश आहे. त्यांना क्रीडा शिक्षक प्रकाश रवंदळे, सज्जन जयस्वाल, अजय खंदारे यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी खेळाडूंचे संस्थाध्यक्ष डॉ.विनय वाघमारे, सचिव विजयकुमार रुद्रवार, उपाध्यक्ष भीमराव कदम, ऑडिटर सेक्रेटरी श्रीनिवास काबरा मुख्याध्यापक विठ्ठल बुच्चलवार व पंजाब आहेर, तालुका क्रीडा संयोजक धरमसिंह बायस, प्रा. सतीश बरकुंटे, विवेक कोंडेकर यांनी अभिनंदन केले आहे.
-----------