

बीड : गेवराई आगाराला डिझेलवर चालणाऱ्या बस उपलब्ध करून द्याव्यात, बसस्थानकात बीओटी तत्वावर व्यापारी संकुलाचे बांधकाम करावे, गेवराई आगाराची पुनर्बांधणी करून आगारातील वाहनतळाचे काँक्रीटीकरण करावे, अशा मागण्या आमदार विजयसिंह पंडित यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केल्या. याप्रसंगी दहा नवीन बस तातडीने उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंत्री सरनाईक यांनी केली.