विजयादशमीला पूर्णेत ५१ फुटी रावणाचे दहन
-----------
राजे संभाजी मित्र मंडळातर्फे जय्यत तयारी सुरू
पूर्णा, ता. १६ (बातमीदार) : शहरातील राजे संभाजी मित्र मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त मंगळवारी (ता. २०) रात्री ८ वाजता जुना मोंढा बाजार मैदानावर ५१ फुटी रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांच्या हस्ते रावणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंजाभाऊ कदम व सुनील कदम यांनी दिली.
राजे संभाजी मित्र मंडळाने मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या २१ वर्षांपासून रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, सोपान महाराज बोबडे, डॉ. विनय वाघमारे, डॉ. हरिभाऊ पाटील, हिराजी भोसले, उपजिल्हाप्रमुख दशरथ भोसले, तालुकाप्रमुख व्यंकटराव पौळ, पं.स.चे उपसभापती काशीनाथ काळबांडे, नगरसेवक संतोष एकलारे, जि.प. सदस्य रितेश काळे, गजानन आंबोरे, संजय जल्हारे व मुंजाभाऊ कुकर, प्रदीप चापके, चंद्रकांत पवार, सचिन ऊर्फ पप्पू कदम, दादाराव पंडित, नगरसेवक रौफ कुरेशी, प्रकाशराव कऱ्हाळे, श्यामराव कदम, प्रमोद ऊर्फ राजूअण्णा एकलारे, प्रा. गोविंद कदम, गजानन हिवरे, शंकर गलांडे, मनोज उबाळे, रवी जयस्वाल, बालाजी वैद्य, गोविंद सोलव, गजानन सवराते, बंडुअप्पा बनसोडे आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजे संभाजी मित्रमंडळाचे विक्की कदम, मुंजाभाऊ कदम, सुनील कदम, अमृतराज कदम, शिवा पाथरकर, राजू माने, अंकित कदम, विकास वैजवाडे, ज्ञानेश्वर कदम, अजय एकलारे, वैभव कुऱ्हे , राजू सोळंके, केशव कदम, अक्षय कहाते, अतुल बाबर, कल्याण कदम, लक्ष्मण कदम, सोमनाथ शिराळे, विष्णू कदम, रामेश्वर कदम, दत्ता कदम, रवी कदम आदींनी केले आहे. शुक्रवारी (ता.१६) शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे, पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे, आयोजक मुंजाभाऊ कदम, सुनील कदम यांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली.