esakal | माणुसकीचं दर्शन! विजेच्या धक्क्याने मृत पावलेल्या माकडाची काढली अंत्ययात्रा
sakal

बोलून बातमी शोधा

soyagaon

माणुसकीचे दर्शन दाखवीत येथील ग्रामस्थांनी या मृत माकडाची अंत्ययात्रा काढली

माणुसकीचं दर्शन! विजेच्या धक्क्याने मृत पावलेल्या माकडाची काढली अंत्ययात्रा

sakal_logo
By
स्वामी नरेंद्र

सोयगाव (औरंगाबाद): विजेच्या तारास स्पर्श होताच जोराचा धक्का बसल्याने एका वानराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वरठाण (ता सोयगाव )येथे रविवारी सायंकाळी घडली. मात्र वरठाण गावात माणुसकीचे दर्शन दाखवीत येथील ग्रामस्थांनी या मृत माकडाची अंत्ययात्रा काढली. या प्रकारची सोयगाव तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे.

सोयगाव तालुक्यातील डोंगर काठच्या भागात असलेल्या वरठाण परिसरात गेल्या काही दिवसांपासून  जवळपास पन्नास माकडांची टोळी सक्रिय झाली आहे. गावात ही घर ते घर अशा प्रकारे उड्या मारतात ग्रामस्थ मात्र या माकडांच्या टोळक्यात रमले असल्याने येथील माकडांच्या टोळ्या ग्रामस्थांमध्ये रमल्या आहेत. काही खायला दिले ते अलगद घेतात आतापर्यंत कुणालाही त्या वानरांनी इजा पोहचलेली नाही.

औरंगाबादच्या नागद घाटात जाफराबाद-मालेगाव एसटी बसचे ब्रेक फेल, नशीब बलवत्तर...

रविवारी ही टोळी पाचच्या सुमारास जिल्हा परिषद शाळेकडे आली असताना उड्या मारत असताना मुख्य वीज प्रवाहाच्या तारेस एका माकडाचा स्पर्श झाल्याने त्यास विजेचा जोराचा झटका बसल्याने जागीच मृत्यू झाला. आपल्या सहकाऱ्याचा मृत्यू झाल्याचे पाहून टोळीतील सर्वजण एकत्र येऊन मृत माकाडाजवळ बसलेले दृश्य पाहुन ग्रामस्थांना देखील दुःख वाटते होते. काही तरूणांनी पुढाकार घेऊन विधी प्रमाणे अत्यंयात्रा काढून त्या वानराचा दफणविधी कार्यक्रम केला. यावेळी सरपंच अणिल सोळंके, पोलीस पाटील नरेंद्र सोळंके, नितीन सोळंके, नामदेव सुर्यवंशी,बालू खंडाळे,मनोज जाधव, विकास महाले, कीशोर सोळंके, अरविंद जाधव,कल्याणसिंग सोळंके, बाळासाहेब सोळंके, यांच्या सह आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

अवघ्या चार दिवसांत पावणेसहाशे रुग्ण! कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची झपाट्याने वाढ

वरठाणच्या त्या अंत्ययात्रेची तालुक्यात चर्चा-
वरठाण ता.सोयगाव गावात ग्रामस्थांनी मृत माकडाची विधिवत अंत्ययात्रा काढून त्याचेवर अंत्यसंस्कार केले मात्र या प्रकारची आणि माणुसकीची सोयगाव तालुक्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे

(edited by- pramod sarawale)

loading image