

viral fever outbreak in city areas
Sakal
शहरात गेल्या काही दिवसांपासून व्हायरल तापाची साथ मोठ्या प्रमाणात पसरली असून सर्दी, ताप, खोकला व घसादुखीच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. अचानक बदलणारे हवामान, सकाळी व रात्री जाणवणारी थंडी आणि दुपारी वाढलेल्या तापमानामुळे विषाणूजन्य आजार वाढत असल्याचे जनरल फिजिशियन डॉ. आनंद अग्रवाल यांनी सांगितले.