Sambhajinagar Accident : वडिलांनी लिव्हर देऊन जीवदान दिलेलं, लेक मध्यरात्री चहा प्यायला गेली; ट्रकने उडवल्यानं जागीच मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar Accident : मध्यरात्री मित्रांसोबत स्कुटीवरून निघालेल्या या मुलींच्या गाडीला अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिल्याने एकीचा मृत्यू (Visakha Vanjare Accident) झाला असून, दोन तरुणी गंभीर जखमी आहेत.
छत्रपती संभाजीनगर : नियतीच्या क्रूर फेऱ्यांनी एक कुटुंब उद्ध्वस्त झालं. वर्षभरापूर्वी वडिलांनी स्वतःच्या लिव्हरचं दान करून जिला जीवनदान दिलं, त्या २० वर्षीय मुलीचा (Liver Transplant Girl Dies) एक भीषण अपघात आयुष्य घेऊन गेला.