वाल्मीने शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोचवावे, मृदा व जलसंधारण मंत्र्यांचे निर्देश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Soil Conservation Minister Shankar Gadakh

शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आवश्‍यक असणारे अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवावे. त्यासाठी शेतकरी प्रशिक्षण वर्ग घ्यावे. वर्षभराचा प्रशिक्षण आराखडा विभाग निहाय तयार करुन सादर करावा असे निर्देश मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.

वाल्मीने शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोचवावे, मृदा व जलसंधारण मंत्र्यांचे निर्देश

औरंगाबाद : जल व भूमी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात वाल्मी संस्थेचे योगदान उल्लेखनीय राहीलेले आहे. शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आवश्‍यक असणारे अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवावे. त्यासाठी शेतकरी प्रशिक्षण वर्ग घ्यावे. वर्षभराचा प्रशिक्षण आराखडा विभाग निहाय तयार करुन सादर करावा असे निर्देश मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.

वाल्मी मृदा व जलसंधारण आयुक्त कार्यालय येथे आयोजित मृदा व जलसंधारण कार्यालयात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मृदा व जलसंधारण आयुक्त मधुकर आर्दड, अपर आयुक्त विश्‍वनाथ नाथ, उपायुक्त रवींद्र गोटे, (प्रशासन), अभियांत्रीक शाखा विभागप्रमुख प्रा. डॉ.अविनाश गारुडकर, विज्ञान विद्याशाखा प्रमुख प्रा. डॉ. अजय इंगळे, प्रा. डॉ. दिलीप दुरबुडे, सहाय्यक आयुक्त, मृदा व जलसंधारण सुहास वाघ, प्रशासकीय अधिकारी अशोक गायकवाड, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी वसंत गालफाडे, जलसंधारण अधिकारी अमोल राठोड यांची उपस्थिती होती.

पिकांची नुकसानभरपाई द्या, अन्यथा फिरु देणार नाही, निलंगेकरांचा इशारा

जलसंधारण मंत्री गडाख यांनी वाल्मीमध्ये शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम, चर्चासत्रे आणि संशोधन उपक्रमात भरीव प्रमाणात वाढ होणे गरजेचे आहे. पाणी आणि माती प्रयोगशाळेबद्दल शेतकऱ्यांमध्ये विश्‍वासहर्ता जास्त प्रमाणात आहे. हे लक्षात घेऊन जास्तीत जास्त संख्येने येथील प्रयोगशाळेतून परिक्षण अहवाल शेतकऱ्यांना उपलब्ध करुन द्यावेत. येत्या वर्षभराचा प्रशिक्षण आराखडा विभाग निहाय तयार करुन सादर करावा. शासनस्तरावर त्याच्या अधिक प्रभावी अमंलबजावणीसाठी पाठपुरावा करण्यात येईल. राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माफत दरात माती परिक्षण सुविधा उपलब्ध करण्यासाठी वाल्मीतील माती परिक्षण केंद्रात आधुनिक उपकरणे बसविण्यात येतील. संस्थेच्या विविध मागण्या, रिक्त पदांच्या भरती बाबत शासन स्तरावरुन प्रयत्न करण्याचे आश्‍वासन ही त्यांनी यावेळी दिले.


(संपादन - गणेश पिटेकर)

Web Title: Walmi Should Give New Technology Farmers Said Minister Gadakh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top