

बीड : संतोष देशमुख यांचा खून खंडणीला अडसर आल्यानेच झाल्याचे सीआयडीच्या विशेष तपास पथकाने केलेल्या तपासातून समोर आले. यावरून वाल्मीक कराड हाच खुनाचा सूत्रधार असल्याचा ठपका न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपत्रात करण्यात आला आहे. वाल्मीक कराडने खंडणीसाठी सहा वेळा फोन केल्याचा धक्कादायक खुलासा दोषारोपपत्रात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे वाल्मीकने खंडणीसाठीचे काही कॉल धनंजय मुंडे यांच्या परळीतील जगमित्र कार्यालयातून देखील केले व याच कार्यालयात त्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावल्याचीही नोंद यात आहे.