वाळूज परिसरातील ग्रामपंचायतींचे असे आहे आरक्षण, जाणून घ्या...

News About Waluj Jogeshwari And Rangon GramPanchayat Elections
News About Waluj Jogeshwari And Rangon GramPanchayat Elections

वाळूज (जि. औरंगाबाद) - वाळूज, रांजणगाव (शेणपुंजी) आणि जोगेश्वरी येथे ग्रामसभा घेऊन वॉर्ड आरक्षण सोडत मंगळवारी (ता. चार) काढण्यात आली. यात वाळूज येथे गदारोळ होऊन आरक्षण सोडत प्रकियेवर पदाधिकारी व नागरिकांनी आक्षेप घेतला. 

वाळूज, रांजणगाव (शेणपुंजी) आणि जोगेश्वरी या तीन ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना करण्यात येऊन
ग्रामपंचायतीच्या वॉर्डांतील सदस्यांची आरक्षण सोडत काढण्यासाठी विशेष ग्रामसभा मंगळवारी घेण्यात आली. यावेळी सरपंच संजीवनी सदावर्ते, उपसरपंच अशोक शेजूळ, जिल्हा परिषद सदस्या उषा हिवाळे, पंचायत समिती सदस्य दीपक बडे, ग्रामपंचायत सदस्य दत्तू हिवाळे, सुभाष सोनवणे, अशोक जाधव आदी उपस्थित होते. ग्रामसभेला ग्रामपंचायत सदस्यांसह नागरिकांनी गर्दी केली होती. 

रांजणगाव (शेणपुंजी) 

येथे अध्यासी अधिकारी सतीश भदाणे, सहायक तलाठी राहुल वंजारी, ग्रामविकास अधिकारी एस. एन. रोहकले आदींच्या उपस्थितीत ग्रामसभेत आरक्षण जाहीर करताना अनेकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे चिठ्या टाकून आरक्षण जाहीर करण्यात आले. यात रांजणगाव येथे एकूण सहा प्रभागांतून 17 सदस्य निवडून दिले जाणार आहेत. 

रांजणगावचे (शेणपुंजी) आरक्षण असे 

  • प्रभाग क्रमांक एकमध्ये एकूण जागा तीन : सर्वसाधारण एक, ओबीसी पुरुष एक, एससी महिला एक. 
  • प्रभाग क्रमांक दोनमध्ये एकूण जागा तीन : ओबीसी महिला एक, सर्वसाधारण महिला एक, सर्वसाधारण एक. 
  • प्रभाग क्रमांक तीनमध्ये एकूण जागा दोन : सर्वसाधारण महिला एक, सर्वसाधारण एक. 
  • प्रभाग क्रमांक चारमध्ये एकूण जागा तीन : एससी महिला एक, ओबीसी महिला एक, सर्वसाधारण एक. 
  • प्रभाग क्रमांक पाचमध्ये एकूण जागा तीन : जागा, एससी पुरुष एक, ओबीसी महिला एक, सर्वसाधारण महिला एक 
  • प्रभाग क्रमांक सहामध्ये एकूण जागा तीन : ओबीसी पुरुष एक, सर्वसाधारण महिला एक, सर्वसाधारण एक. 

जोगेश्वरी 
येथे आरक्षण अध्यासी अधिकारी सतीश भदाणे, सरपंच सोनू लोहकरे, उपसरपंच मंगलबाई नीळ यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. जोगेश्वरी येथे एकूण सहा प्रभांगतून 17 सदस्य आहेत. 

जोगेश्वरीचे आरक्षण असे 

  • प्रभाग क्रमांक एक : एकूण जागा दोन, एससी महिला एक, सर्वसाधारण एक. 
  • प्रभाग क्रमांक दोन : एकूण जागा तीन, एससी पुरुष एक, ओबीसी पुरुष एक, सर्वसाधारण महिला एक. 
  • प्रभाग क्रमांक तीन : एकूण जागा तीन, एससी पुरुष एक, ओबीसी महिला एक, सर्वसाधारण एक. 
  •  प्रभाग क्रमांक चार : एकूण जागा तीन, ओबीसी पुरुष एक, एससी महिला एक, सर्वसाधारण एक. 
  • प्रभाग क्रमांक पाच : एकूण जागा तीन, ओबीसी महिला एक, सर्वसाधारण महिला एक, सर्वसाधारण एक. 
  • प्रभाग क्रमांक सहा : एकूण जागा तीन, ओबीसी पुरुष एक, सर्वसाधारण महिला एक, सर्वसाधारण एक. 

 
वाळूज 
येथे अध्यासी अधिकारी राजन खापर्डे, सहायक तलाठी अशोक कळसकर व ग्रामविकास एस. सी. लव्हाळे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी सरपंच पपीन माने, माजी सरपंच सईदाबी पठाण, संजय शिंदे, अविनाश गायकवाड, अनिल साळवे, सर्जेराव भोंड, अन्सारखान पठाण, सचिन काकडे, रवी मनगटे, संदीप तुपे, नंदू सोनवणे, दयानंद साबळे, काकासाहेब चापे, उत्तम बनकर आदी उपस्थित होते. वाळूज या ग्रामपंचायतीतही सहा प्रभागांतून 17 सदस्य निवडले जाणार आहेत.  

वाळूजची आरक्षण सोडत अशी 

  • प्रभाग क्रमांक एक : एकूण जागा दोन, एससी महिला एक, सर्वसाधारण एक 
  • प्रभाग क्रमांक दोन : एकूण जागा तीन, एससी महिला एक, ओबीसी महिला एक, सर्वसाधारण एक 
  • प्रभाग क्रमांक तीन : एकूण जागा तीन, ओबीसी पुरुष एक, एससी महिला एक, सर्वसाधारण महिला एक 
  • प्रभाग क्रमांक चार :: एकूण जागा तीन, एससी पुरुष एक, ओबीसी पुरुष एक, सर्वसाधारण महिला एक 
  • प्रभाग क्रमांक पाच : एकूण जागा तीन, एससी पुरुष एक, ओबीसी महिला एक, सर्वसाधारण महिला एक. 
  • प्रभाग क्रमांक सहा : एकूण जागा तीन, एससी पुरुष एक, ओबीसी महिला एक व सर्वसाधारण एक. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com