Waluj MIDC Fire : छ. संभाजीनगरात मध्यरात्री हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; 6 कामगारांचा होरपळून मृत्यू

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत (Waluj Industrial Estate) मध्यरात्री भीषण दुर्घटना घडलीये.
Fire
Fire esakal
Summary

वाळूज औद्योगिक परिसरात हँडग्लोज बनवणारी सनशाईन एंटरप्राईज कंपनी आहे. या कंपनीला मध्यरात्री अचानक आग लागली.

Waluj MIDC Fire News : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत (Waluj Industrial Estate) मध्यरात्री भीषण दुर्घटना घडलीये. येथील हँडग्लोज (Handgloves) बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राईज कंपनीत (Sunshine Enterprise Company) भीषण आग लागली असून यात कंपनीतील 6 कामगारांचा झोपेत असतानाच होरपळून मृत्यू झाला आहे.

तर, कंपनीतील चार कामगारांनी बाहेर पडून आपला कसाबसा जीव वाचवला आहे. ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. वाळूज औद्योगिक परिसरात हँडग्लोज बनवणारी सनशाईन एंटरप्राईज कंपनी आहे. या कंपनीला मध्यरात्री अचानक आग लागली.

Fire
निवडणुकीत महाविकास आघाडी अशी पडेल, पुन्हा ती उभीच राहणार नाही; मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा निशाणा

या दुर्घटनेत 6 कामगारांचा जळून मृत्यू झाला, तर 4 कामगारांनी स्वतःचा जीव वाचवला आहे. सनशाईन एंटरप्राईज सी 216 हँडग्लोज तयार करते. या कंपनीत 20 ते 25 कामगार काम करतात.

Fire
Hasan Mushrif : 'कोल्हापूरच्या हद्दवाढीची मुख्यमंत्री शिंदे करणार लवकरच घोषणा'; 'या' गावांचा असणार समावेश

दरम्यान, हे सर्व कामगार बिहारमधील असल्याचं कळतंय. ते कामानिमित्त येथे आले होते. या कंपनीत हँडग्लोज आणि जॅकेट बनवलं जात होतं. मात्र, कंपनीतील या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com