पाणी, जलसंधारणावर खर्च न करणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई करणार

पाणी, जलसंधारणावर खर्च न करणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई करणार
Published on: 
पाणी, जलसंधारणावर खर्च न केल्यास ग्रा.पं.वर कारवाई ------------------- विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचा इशारा सकाळ वृत्तसेवा परभणी,ता. १७ ः ज्या ग्रामपंचायती गावच्या गरजेनुसार आपला निधी पाणीपुरवठा, जलसंधारण, शालेय, भौतिक सुविधांवर खर्च करणार नाहीत त्यांच्यावर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिला आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. सद्यःस्थितीत महाराष्ट्रभर दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने यापुढे ग्रामपंचायतीला पाणीटंचाई, चारा, शाळेतील सुविधांवर खर्च करावा लागणार असल्याच्या सूचना यावेळी जी. श्रीकांत यांनी यंत्रणेला दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, अपर आयुक्त दादासाहेब वानखेडे, सहायक आयुक्त डॉ. ज्ञानोबा मोकाटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, प्रकल्प संचालक डॉ. स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर यांच्यासह जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी विभागीय आयुक्तांनी पेन्शन अदालत, आश्वासित योजनांचा लाभ देणे, स्थायित्वाचा लाभ देणे, आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारी निकाली काढणे, प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे निकाली काढणे, घरकुल योजना, जल जीवन मिशन याबाबत सविस्तर आढावा घेतला. गरजू शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह समारंभ पार पाडण्यासाठी प्रशासनातर्फे सामुहिक विवाह सोहळा कार्यक्रमाचे नियोजन तालुका किंवा गाव स्तरावर करण्याबाबत त्यांनी सूचित केले. -------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com