पाणी जपून वापरा

पाणी जपून वापरा
Published on: 
पाण्याचा काटकसरीने वापर करा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन धाराशिव, ता. १४ (बातमीदार) : जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाट्याने घटत असल्याने आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. वाढते तापमान, पाण्याचे बाष्पीभवन आणि खालावणारी भूजलपातळी यामुळे उपलब्ध जलसाठ्यावर ताण वाढत आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सध्या एकूण क्षमतेच्या केवळ ६.४४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुढील दहा महिने पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता ७२५ दशलक्ष घनमीटर आहे. एक सप्टेंबर रोजी या प्रकल्पांमध्ये ५९.६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. ११ ऑक्टोबरपर्यंत तो घटून ४६.७५ दशलक्ष घनमीटरवर आला आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवन वेगाने होत असून, भूजलपातळीतही अपेक्षित सुधारणा झालेली नाही. त्यामुळे विहिरी आणि कूपनलिकांमधील पाणी उपलब्धतेवर परिणाम होण्याची भीती आहे. जिल्ह्यात २०१५ मध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्या वेळी जलसाठा १२ दशलक्ष घनमीटरपर्यंत घसरल्याने नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी ४६८ टँकर सुरू करावे लागले होते. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी आतापासूनच पाण्याचे नियोजन आवश्यक आहे. संभाव्य दुष्काळाचा सामना करण्यासाठी प्रत्येक गावात नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा व पाणी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी शासन, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्न करावेत. राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीयांनी सामूहिक जबाबदारीने काम करावे, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com