आंबी अवतीभवती व वाल्हा गावासाठी टँकर सुरू करण्याची मागणी; बिरोबाची वाडी, गिरवली येथे पाणी अधिग्रहणाची मागणी

आंबी	
अवतीभवती व वाल्हा गावासाठी टँकर सुरू करण्याची मागणी; बिरोबाची वाडी, गिरवली येथे पाणी अधिग्रहणाची मागणी
Published on: 
आंबी, वाल्हा गावांना टँकरची प्रतीक्षा बिरोबाची वाडी, गिरवलीत विहीर अधिग्रहणाची मागणी भूम, ता. १३ (बातमीदार) : भूम तालुक्यात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर आंबी आणि वाल्हा या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी पंचायत समिती प्रशासनाकडे करण्यात आली आहे. तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने विहिरी, बोअरवेल आणि अन्य जलस्रोतांच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः महिला आणि लहान मुलांची पाण्यासाठी धावपळ होत आहे. दरम्यान, बिरोबाची वाडी आणि गिरवली येथेही आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गावांतील जलस्रोतांचे अधिग्रहण करण्याची मागणी पंचायत समिती कार्यालयाकडून तहसील कार्यालयाकडे करण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून टँकर सुरू करावेत आणि जलस्रोत अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. ............................. फोटो ओळी धाराशिव : दिवाळीनिमित्त गवळी गल्लीत म्हशी पळविण्याचा कार्यक्रम झाला. पशूंना घेऊन सहभागी झालेले गवळी. .................... म्हशी पळविण्याची शतकांपासूनची परंपरा राखली कायम हलगीच्या तालावर गवळी समाजाचा उत्साह; आकर्षक सजावट केलेल्या म्हशी, रेड्यांचे प्रदर्शन धाराशिव, ता. १३ (बातमीदार) : दिवाळीच्या सणानिमित्त शहरातील गवळी गल्लीत पारंपरिक म्हशी पळविण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शतकानुशतके चालत आलेली ही परंपरा गवळी समाजाने यंदाही जपली. म्हशी आणि रेड्यांची आकर्षक सजावट करून पशुपालकांनी आपल्या जनावरांच्या विविध कला सादर केल्या. गवळी समाजातील कारभारी काशिनाथ दिवटे आणि भीमाशंकर दहीहंडे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. म्हशींच्या अंगावरील केसांची कापणी करून विविध नक्षीकाम करण्यात आले होते. रंगीत सजावट, मोरपिसे, मुरकुजांच्या साहाय्याने जनावरे सजविण्यात आली होती. घोंगडी आणि हाताच्या इशाऱ्यावर म्हशी पळविण्याची कला पशुपालकांनी दाखविली. काहींनी दुचाकीच्या आवाजावर, तर काहींनी स्वतःच्या आवाजावर जनावरांना पळविले. कुराडे, सुरवसे, कदम, शेख, काजी, शेरकर, पवार, झेंडे, कांबळे, वाघमारे, दहीहंडे, मिसाळ, उपाध्ये आदी पशुपालकांनी सहभाग घेतला. हलगीचा निनाद आणि फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दुमदुमून गेला. प्रा. गजानन गवळी, राजकुमार दिवटे, नंदकुमार हुच्चे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज अंजीखाने, श्रीकांत दिवटे, कल्याण गवळी, विश्वास दळवी आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ........................... BMH26A10150 सद्‍गुरू शामनाथ महाराज आजपासून कार्तिकवारी दिंडी भूम, ता. १३ (प्रतिनिधी) : सद्‍गुरू शामनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्री क्षेत्र सामानगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर या कार्तिकवारी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता. १४) सकाळी दिंडीचे प्रस्थान होणार असून, २८ नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र सामानगाव येथे दिंडीची सांगता होणार आहे. या सोहळ्यात भाविक आणि वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. दिंडीचा प्रवास १४ नोव्हेंबर रोजी नृसिंहनाथ येथून सुरू होईल. त्यानंतर आसू, खिंडारे, माढा, वडाचीवाडी आणि रोपळे येथे मुक्काम राहणार आहे. २० ते २३ नोव्हेंबरदरम्यान पंढरपूर येथे चार दिवस मुक्काम असेल. २४ नोव्हेंबर रोजी पौर्णिमेला सकाळी काला करून सामानगावकडे परतीचा प्रवास सुरू होईल. त्यानंतर सुर्वेवस्ती, मोडनिंब, कुळवाडी, परांडा आणि पाचपिंपळा येथे मुक्काम होईल. २८ नोव्हेंबर रोजी सामानगाव येथे दिंडीचे आगमन झाल्यानंतर आरती करून सांगता करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची परंपरा आणि भक्तिभावाचा जागर होणार आहे. धर्मराज महाराज सामानगावकर यांच्या वतीने भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.