पाणीटंचाई निवारणार्थ ३ कोटी रुपयांचा आराखडा

पाणीटंचाई निवारणार्थ ३ कोटी रुपयांचा आराखडा
Published on: 
पाणीटंचाई निवारणार्थ तीन कोटींचा आराखडा जळकोट,ता.६ : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात आगामी काळात पाणीटंचाई भासू नये यासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्याच्या कालावधीसाठी पंचायत समितीच्या वतीने तीन कोटी ३६ लाख रुपयांचा आराखडा तयार केला आहे. टँकर तसेच बैलगाडीद्वारे दहा गावे व सहा वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३७ लाख ४४ हजार रुपये, २७ गावांमध्ये खासगी विहीर तसेच विंधन विहीर अधिकरण करण्यासाठी ६८ लाख ५८ हजार रुपये, ४३ गावांमध्ये विंधन विहीर घेण्यासाठी ४३ लाख रुपये, सोळा गावांमध्ये नळ योजना विशेष दुरुस्ती करण्यासाठी एक कोटी ४९ लाख रुपये, तसेच आठ गावांमध्ये गाळ काढण्यासाठी तेरा लाख ५० हजार रुपये, असा एकूण ३ कोटी ३६ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आतनुर तांडा, वाघमारे तांडा, डोंगरेवाडी तांडा, राठोड तांडा, गव्हाण, पोमा तांडा, चतुरा तांडा, फकरू तांडा, मंगरूळ'', लाळी खुर्द, ढोरसांगवी, करंजी, येवरी, सोनवळा, घोणसी तांडा , धर्मा तांडा, धोंडवाडी, डोंगर कोणाळी, अग्रवाल तांडा, एकुर्का, बोरगाव खुर्द, रावजी तांडा, मेघा तांडा, आश्रम तांडा, भवानीनगर तांडा, तिरुका, होकरणा, उमरदरा, केकतशिंदगी, चाटेवाडी, जगळपूर, विराळ, हावरगा, डोमगाव,उमरगा रेतू, येलदरा, माळहिपरगा, शिवाजीनगर तांडा, डोंगरगाव, पाटोदा खुर्द, कुणकी, कोळनूर, पाटोदा बुद्रूक यासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आराखड्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. तसेच पाणीटंचाई कक्षाची स्थापनाही करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com