दुष्काळात परभणीच्या रब्बी हंगामासाठी कालव्यांद्वारे पाणी वितरण सुरू

दुष्काळात परभणीच्या रब्बी हंगामासाठी कालव्यांद्वारे पाणी वितरण सुरू
Published on: 
परभणीपर्यंत पोचले पाण्याचे आवर्तन ------------------ जायकवाडीच्या कालव्यांद्वारे रब्बी हंगामासाठी वितरण सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. १३ : यंदा एल निनोच्या प्रभावामुळे मराठवाड्यात पाऊस कमी पडला. त्यामुळे येथे उन्हाळ्यात संभाव्य चारा आणि पाणीटंचाई लक्षात घेता राज्य शासनाने रब्बी हंगामातील पशुचारा आणि पिण्याच्या पाण्याची उपाययोजना करण्यासाठी जायकवाडी धरणातून रब्बी हंगामाकरिता कालव्यांद्वारे पाणी वितरण सुरू केले आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतीला डाव्या कालव्याद्वारे पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. नाथसागर जलाशयातून सोडण्यात आलेल्या पाण्याचे उजवा व डाव्या कालव्याच्या माध्यमातून नियोजित वितरण होत आहे. या पाण्याच्या आवर्तनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे आधार मिळाला आहे. डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेला विसर्ग परभणीत पोचला असून, जिल्ह्यातील रब्बी हंगामाला सिंचनाचे बळ मिळाल्याने शेतकरी रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याकामी गुंतला आहे. एल निनोमुळे उद्भवलेल्या संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रथम प्राधान्याने अन्नधान्य व चारा पिकांची लागवड करून घ्यावे. जायकवाडी प्रकल्पांतर्गत सर्व लाभधारकांनी पाणी वापराबाबत आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन नुकतेच जलसंपदा विभागाने केले आहे. जायकवाडी प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्यानुसार रब्बी हंगामात तीन पाणीपाळ्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जायकवाडीच्या कालव्यांमधून सुरू झालेल्या पाणी वितरणामुळे रब्बी हंगामातील पिकांना आवश्यक ओलावा मिळण्यास मदत होणार असून, उपलब्ध जलसाठ्याच्या योग्य व्यवस्थापनातून शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजा संतुलित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. --------- शेतकऱ्यांकडून मागविले अर्ज ज्वारी, गहू, इतर अन्नधान्य तसेच चारा पिकांसाठी १५ ऑक्टोबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत कालव्याद्वारे तसेच मंजूर उपसा सिंचन योजनांद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी जलसंपदा विभागाने नुकतेच शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी करणारे अर्ज मागविले आहेत. यंदाच्या हंगामात पावसाचे असमान वितरण आणि काही भागांतील पाणीटंचाई यामुळे शेतीसमोरील आव्हाने लक्षात घेऊन राज्य शासनाकडून उपलब्ध जलसाठ्याचा काटेकोर वापर करून शेती व पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. ---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.