कालव्याची दुरुस्ती करुन जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडवा

कालव्याची दुरुस्ती करुन जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडवा
Published on: 
‘जामगव्हाण-पिंपळदरी कालव्याचे काँक्रिटीकरण करून पाणी सोडा’ हिंगोली, ता. ८ : औंढा नागनाथ तालुक्यातील पूर व कंजारा परिसरातील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता, जामगव्हाण-पिंपळदरी तलावातून मुख्य नाल्यामध्ये तातडीने पाणी सोडावे, तसेच संपूर्ण कालव्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करावे, अशी आग्रही मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीला पाठबळ देण्यासाठी पूर ग्रामपंचायतीने घेतलेला अधिकृत ठरावही निवेदनासोबत जोडण्यात आला आहे. पूर आणि कंजारा ही गावे जामगव्हाण-पिंपळदरी तलावाच्या सिंचन क्षेत्राखाली येतात. सध्या परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतीसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्ही गावांच्या मध्यभागी कालव्याच्या क्रॉसिंगजवळ असलेल्या मुख्य नाल्यावर सिमेंट साठवण बंधारे बांधण्यात आले आहेत. तलावातून या बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडल्यास जनावरांच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ सुटू शकतो. शिवाय, परिसरातील सिंचन विहिरी आणि कूपनलिकांची (बोअरवेल) भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे. चौकट तातडीने दखल घेण्याची मागणी कालव्याची दुरवस्था झाल्याने पाण्याची मोठी गळती होते. त्यामुळे कालव्याचे तातडीने सिमेंट काँक्रिटीकरण करून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रदेशाध्यक्ष बालाजी वानखेडे, भगवानराव वानखेडे, बाळासाहेब वानखेडे, खंडोजी वानखेडे, सुभाष कल्याणकर आदींच्या स्वाक्षरीने प्रशासनाला सादर करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.