esakal | 'पाण्याचे नियोजन करा अन्यथा आयुक्तांच्या घराची नळजोडणी तोडू'; मनसेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

mns

'पाण्याचे नियोजन करा अन्यथा आयुक्तांच्या घराची नळजोडणी तोडू'; मनसेचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: गेल्या काही वर्षापासून शहराला आठवड्यात एकदा पाणी येते. जायकवाडीत मुबलक पाणीसाठा असतानाही केवळ मनपाच्या नियोजनशून्य कारभारमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पुढील दहा दिवसांत आठवड्यातून दोनदा पाणीपुरवठा करावा, पाणीपट्टी कमी करावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली. तसेच, पुढील दहा दिवसांत हा निर्णय न घेतल्यास मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या शासकीय निवासस्थानाचे कनेक्शन तोडण्यात येईल, असा इशारा मनसेच्यावतीने देण्यात आला आहे.

शहरातील पाणीपुरवठा वाढावा याकरिता आयुक्त पांडेय यांना निवेदन दिले असल्याची माहिती जिल्हा संघटक बिपिन नाईक यांनी दिली आहे. नवीन योजनेचे स्वप्न दाखवून शहरवासीयांची दिशाभूल करण्यात येत आहे. चार दिवसांआड येणारे पाणी आता आठ दिवसांआड करण्यात आले आहे. असे असतानादेखील राज्यात सर्वाधिक पाणीपट्टी वसूल करणारी मनपा म्हणून औरंगाबादचे नाव आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे दहा दिवसांत आठवड्यातून दोन दिवस पाणी द्यावे, अशी मागणी करण्यात आली. या वेळी वैभव मिटकर, शहर उपाध्यक्ष राहुल पाटील, मनविसे जिल्हाध्यक्ष संकेत शेटे, प्रशांत दहिवाडकर, मनीष जोगदंडे आदींची उपस्थिती होती.

loading image