
लातूर : उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्याने लघू, मध्यम तसेच मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा कमी होत आहे. त्यात मांजरा नदीवर असलेल्या उच्च पातळीवरील बंधाऱ्यांतील (बॅरेजेस) साठा कमी झाला आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मांजरा धरणातील पाण्याने पाच बंधारे भरून घेतले जाणार आहेत. त्यासाठी नदीपात्रात धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. यातून लातूर तालुका तसेच बीड जिल्ह्यातील काही भागांतील चार हजार हेक्टर सिंचनाला पाणी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.