
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या प्रमुख प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. परिणामी, धरणातील पाणीसाठ्यात सद्यःस्थितीत ९३.२० टक्के पाणीसाठा झाला. हा पाणी साठा गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढला. गेल्या वर्षी २८ ऑगस्टला हा साठा ५३.४२ टक्के इतका होता. ११ मोठ्या धरणांपैकी दोन धरणे शंभर टक्के भरली.