
वैजापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) : मध्यरात्रीच्या सुमारास पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना तालुक्यातील राहेगाव येथे रविवारी (ता.१५) उघडकीस आली. अनिता चांगदेव शेलार (५५, राहेगाव, ता.वैजापूर) असे मृत महिलेचे नाव असून चांगदेव रामराव शेलार (५७, राहेगाव) असे मारेकरी पतीचे नाव आहे.