Crime Newssakal
छत्रपती संभाजीनगर
Crime News : पत्नीचा गळा दाबून खून; संशयित पती ताब्यात, खुनाचा गुन्हा दाखल
Domestic Violence : मोबाइलवरून झालेल्या वादातून औरंगाबादच्या मोहंद्री येथे एका पतीने पत्नीचा काठीने मारहाण करत गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिशोर : मोहंद्री (ता. कन्नड) येथे शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या पतीने पत्नीचा काठीने मारहाण करत गळा दाबून खून केला. पिंकाबाई संजय देवळे (वय २७) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.