उस्मानाबाद जिल्हा बँकेतून राजकीय संदर्भ बदलणार?

२५ अर्ज दाखल, सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
osmanabad bank
osmanabad banksakal

उस्मानाबाद : जिल्हा बँकेची निवडणूक ही जिल्ह्याच्या पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट करणारी निवडणूक असल्याने तिला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आजवर ३२५ अर्जांची विक्री झाली असून, त्यापैकी २५ अर्ज दाखल झाले आहेत. अनेक विद्यमान संचालकांनी अर्ज दाखल करीत मैदानात उडी घेतली आहे. सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.

osmanabad bank
विवाहितेच्‍या खूनप्रकरणी खेडमधील चौघांवर गुन्‍हा

जिल्ह्यामध्ये आमदार राणाजगजितसिंह पाटील हे भाजपमध्ये गेल्याने अनेक राजकीय समीकरण बदलत असल्याचे दिसून येत आहे. खासदार ओमराजे निंबाळकरसह महाविकास आघाडीचे नेते गेल्यावेळी झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी काय रणनीती आखणार तर दुसऱ्या बाजूला आमदार राणा पाटील हे काय प्रयोग करणार? हे या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहे. ही निवडणूक जिल्ह्याच्या स्थानिक निवडणुकाची दिशा ठरविणार असल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे.

राणा पाटील भाजपत आल्यानंतर पहिलीच ही पंचवार्षिक निवडणूक असल्याने त्यांचे राजकीय संदर्भ कशाप्रकारे असतील, याबाबतचे राजकीय अंदाज व्यक्त केले जात आहे. या अगोदर राष्ट्रवादीत असताना त्यांना पक्षाच्या अन्य नेत्यांची शक्ती कामाला येत होती. त्यातुलनेत भाजप काही प्रमाणात कमजोर असल्याने त्याची उणीव ते कशी भरून काढणार, हे देखील पाहावे लागणार आहे.

महाविकास आघाडी होण्याअगोदर जिल्ह्यामध्ये डॉ. पद्मसिंह पाटील व राणा पाटील या पिता- पुत्रांच्याविरोधात स्थानिक पक्ष काही अपवाद वगळले तर एकत्र होते. आता शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी हे एकत्र असून, त्यांच्यामध्ये आघाडी झाल्यास त्याचा मोठा फटका भाजपला सहन करावा लागणार आहे.

जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या टर्मच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी महाविकास आघाडीची नुकतीच सत्ता आलेली होती. तेव्हा आमदार प्रा. तानाजी सावंत पक्षावर नाराज होते. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीबरोबर त्यांचा पारंपरिक विरोध दिसून येतो. यामुळे त्यांनी त्यावेळी भाजपला साथ दिली होती. तेव्हापासून आतापर्यंत प्रा. सावंतांची भाजपशी सलगी अनेकदा समोर आलेली आहे.

osmanabad bank
वंचितला पांडे गुरुजींची सोडचिठ्ठी; धरले कमळ

‘आघाडी’बाबत शिक्कामोर्तब नाही

आमदार राणा पाटील काही वेगळा प्रयोग करतील, याचीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. महाविकास आघाडीच्या पक्षाची चर्चा सकारात्मक असल्याचे सांगितले जात असून, आघाडी करण्याबाबत एकमत झाले असले तरी त्यावर अजून शिक्कामोर्तब झालेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com