
छत्रपती संभाजीनगर : साखरपुडा, गोंधळ, जागरणापासून कीर्तनकाराला उभे राहण्यापर्यंत लागते ती लोकरीपासून तयार केलेली घोंगडीच. तिचे आरोग्यासाठी असलेले महत्त्व अनेकांना माहित असल्याने घोंगडीला मोठी मागणी आहे. याशिवाय लोकरीपासन तयार केलेली जेन, गादी, उशी, चादर, सतरंजी आणि मफलरची मागणी वाढली आहे.