Extortion Case : माझा नवरा हर्सूल जेलमध्ये, तो बाहेर आला तर तुझा खूनच करील! सराफावर हनी ट्रॅप, धमक्या देऊन उकळले १५ लाख!
Jeweler Blackmailed : सराफा व्यापाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून १५ लाखांची खंडणी उकळणाऱ्या महिलेसह दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. आरोपींच्या ताब्यातून गावठी पिस्तूल आणि कार जप्त करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर : शहरातील सराफा व्यापाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून १५ लाखांची खंडणी उकळणाऱ्या महिलेसह दोन आरोपींना सिटी चौक पोलिसांनी अटक केली. माझा पती हर्सूल जेलमध्ये असून तो बाहेर आला तर तुझा खून करेल, अशी धमकी महिलेने दिली होती.