
वाळूज महानगर : भरधाव विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने स्कूटीला मागून जोरात धडक दिली. यात स्कूटीवर मागे बसलेली महिला जागीच ठार झाली. ही घटना धुळे-सोलापूर महामार्गावरील एएस क्लब उड्डाणपुलाजवळ मंगळ वारी (ता. ३तीन) सकाळी १०.३० वाजल्याच्या सुमारास घडली. जयश्री लहू भड (वय ३०, रा. मारेगाव, ता. जि. बीड) असे मृताचे नाव आहे.