Electric Shock : नायगावात विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू
Chh. Sambhajinagar News : नायगाव येथील बकवालनगर कामगार वसाहतीत बुधवारी सकाळी फुले तोडताना ३५ वर्षीय महिलेला विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. सुनैनादेवी अनिल पंडित असे मृत महिलेचे नाव आहे.
वाळूज : घराच्या धाब्यावर जाऊन फुले तोडणाऱ्या महिलेला विजेचा धक्का लागल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना वाळूजलगतच्या नायगावातील बकवालनगर कामगार वसाहतीत बुधवारी (ता. २१) सकाळी घडली. सुनैनादेवी अनिल पंडित (वय ३५, रा. बकवालनगर) असे त्यांचे नाव आहे.