esakal | 'म्युकरमायकोसिस'नंतर महिलेला दुर्धर आजार, शस्त्रक्रिया यशस्वी
sakal

बोलून बातमी शोधा

doctor

अर्धांगवायूचा धोका टाळत या महिलेच्या रक्तवाहिनीत स्टेंटिंग करून यशस्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली.

'म्युकरमायकोसिस'नंतर महिलेला दुर्धर आजार, शस्त्रक्रिया यशस्वी

sakal_logo
By
मनोज साखरे -सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: गंगापूर तालुक्यातील ३१ वर्षीय महिलेची तीन महिन्यांपूर्वी 'म्युकरमायकोसिस'मुळे डाव्या डोळ्याची दृष्टी गेली. संसर्ग वाढल्याने शस्त्रक्रिया करुन डावा डोळाही काढावा लागला. हा धक्का पचवीत असतानाच शरीराच्या उजव्या बाजूची हालचाल कमी झाली. तपासणीनंतर मेंदुच्या डाव्या भागातील रक्त वाहिनीचा आतील भाग अत्यंत अरुंद झाल्याचे निदान झाले. अर्धांगवायूचा धोका टाळत या महिलेच्या रक्तवाहिनीत स्टेंटिंग करून यशस्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली.

हेही वाचा: औरंगाबाद: खडू-फळा सोडून गुरूजी रमले कारकुनीत!

न्यूरो आणि व्हॅस्क्युलर इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट, डॉ. प्रणव वंजारी यांनी तपासणीच्या अनुषंगाने या महिलेची 'सेरेब्रल अँजिओग्राफी' केली. हि अँजिओग्राफी न्यूरो-व्हॅस्क्युलर आजारासाठी प्रमाणित सुवर्णदर्जाची तपासणी मानली जाते. या तपासणीत महिलेच्या डाव्या धमनीतील आतील भाग अत्यंत अरुंद (९० टक्के) आढळला. त्यामुळे मेंदूच्या पुढच्या भागाला रक्तपुरवठा कमी झाला. या कारणाने रुग्णाला उजव्या बाजूचा अर्धांगवायू होण्याचा धोका होता. डॉ. प्रणव वंजारी यांनी रुग्ण आणि नातेवाईकांना या संभाव्य जटील स्थितीबद्दल आणि संभाव्य अर्धांगवायूच्या धोक्याबद्दल मार्गदर्शन करून 'एंडोव्हॅस्कुलर अँजिओप्लास्टी' आणि 'स्टेंटिंग' करण्याचा सल्ला दिला.

हेही वाचा: वाळूजमध्ये नगर-औरंगाबाद महामार्गावर वाहनाच्या धडकेत एक ठार

या रुग्णाला सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये ताबडतोब दाखल करण्यात आले आणि त्यानंतर मेंदूच्या डाव्या गोलार्धात रक्तपुरवठा करणाऱ्या या महत्वाच्या रक्तवाहिनीमध्ये स्टेंटिंग करून यशस्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली. यामुळे रुग्णाच्या डाव्या भागातील रक्तपुरवठा पूर्ववत झाला. ही कमीत कमी चिरफाड (मिनिमल इनव्हेसिव्ह) करून केलेली शस्त्रक्रिया सेठ नंदलाल धूत रुग्णालयाच्या कॅथलॅबमध्ये करण्यात आली आणि त्याला टेक्निशियन महेंद्र तोडकर आणि इम्रान खान यांनी मदत केली. या शस्त्रक्रियेच्या यशस्वीतेबद्दल डॉ. प्रणव वंजारी आणि संपूर्ण कॅथलॅब टीमचे कार्डिलॉजी विभाग प्रमुख हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विलास मगरकर, हॉस्पिटलचे प्रशासक डॉ. हिमांशू गुप्ता, वैद्यकीय संचालक डॉ. विजय बोरगावकर यांनी अभिनंदन केले.

loading image
go to top