केदारखेड्यात महिला शेतकरी

केदारखेड्यात महिला शेतकरी
Published on: 
महिला शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे धडे मेरखेडा येथील मेळाव्यात हवामान अनुकूल शेती, बाजारपेठ, अन्नप्रक्रिया उद्योगावर मार्गदर्शन ----- केदारखेडा, ता. २२ (बातमीदार) : बदलत्या हवामानानुसार पीक नियोजन, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर, शेतमालाला योग्य बाजारपेठ आणि अन्नप्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून उत्पन्नवाढीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सॉईलराज ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडच्या वतीने मेरखेडा येथे महिला शेतकरी मेळावा घेण्यात आला. वॉलमार्ट फाउंडेशनच्या अर्थसाहाय्याने आणि वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या प्रो-राईज प्रकल्पांतर्गत आयोजित मेळाव्याला परिसरातील महिला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला. मेळाव्यात डिजिटल ॲग्रीकल्चर, बाजारपेठ उपलब्धता, महिला सक्षमीकरण, पीजीएस सेंद्रिय प्रमाणीकरण, हवामान अनुकूल शेती, सेंद्रिय शेती आणि सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती अधिक फायदेशीर आणि शाश्वत करण्याच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचे योगेश पाटील यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा शेतीतील वापर, बाजारभावाची माहिती आणि शेतमाल विक्रीचे नियोजन याविषयी मार्गदर्शन केले. शंकर श्रीमंगले यांनी महिला शेतकऱ्यांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण, सामूहिक सहभाग आणि शेतीपूरक व्यवसायांच्या संधी स्पष्ट केल्या. प्रवीण एकुंडे यांनी पीजीएस सेंद्रिय प्रमाणीकरण, जमिनीची सुपीकता टिकविणे आणि नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर याबाबत माहिती दिली. आत्मा कृषी विभाग, भोकरदनचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक धैर्यशील पाटील यांनी अनियमित पाऊस, तापमानातील बदल आणि हवामानातील अनिश्चितता लक्षात घेऊन पीक निवड व नियोजन करण्याची गरज अधोरेखित केली. सॉईलराज ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीच्या संचालक वैशाली कऱ्हाळे, डॉ. मनीषा बोर्डे, वनिता हिरगुडे आणि कांता ढवळे यांनी महिलांशी संवाद साधला. सूत्रसंचालन किशोर कांबळे यांनी केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी विजय हिरगुंडे, सुनील कऱ्हाळे आणि गजानन ढवळे यांनी पुढाकार घेतला. ----- अन्नप्रक्रिया उद्योगातून उत्पन्नवाढ पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत उपलब्ध संधींबाबत वैभव हिवाळे यांनी मार्गदर्शन केले. अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्याची प्रक्रिया, शासकीय अनुदानाच्या संधी आणि व्यवसाय व्यवस्थापन यांची माहिती त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com