रा. प. महाविद्यालयात
कायदेविषयक शिबिर
धाराशिव, ता. ७ : समाजात वावरताना अजिबात भीती न बाळगता आत्मविश्वासाने जगत आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी भोसले यांनी विद्यार्थिनींना दिला.
येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचा महिला सक्षमीकरण, अंतर्गत तक्रार निवारण विभाग आणि धाराशिव शहर पिंक पथकातर्फे पोलिस अधीक्षक कार्यालयात कायदेविषयक जागृती शिबिर घेण्यात आले. पोलिस निरीक्षक इक्बाल सय्यद, सय्यद यांनी पोलिस नियंत्रण कक्ष, भरोसा सेल, अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट, आर्थिक गुन्हे शाखा, स्थानिक गुन्हे शाखा आणि पिंक पथक यांच्या कार्यपद्धतीबाबत विद्यार्थिनींना माहिती दिली. त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या ‘११२’ या आपत्कालीन हेल्पलाइनबाबत संदीप सुरवसे यांनी मार्गदर्शन केले. मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या कामकाजाविषयी सुनील सोनटक्के यांनी, तर आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्याबाबत सहायक पोलिस निरीक्षक देशमुख यांनी माहिती दिली. सध्याच्या डिजिटल युगात महिलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सायबर सेलबाबतही यावेळी सांगण्यात आले.
प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सक्षमीकरण विभाग प्रमुख डॉ. स्वाती जाधव, डॉ. सी. आर. दापके, सहसमन्वयक शिल्पा डोळे, सुधीर तुगावकर, श्रीशैल कट्टे, बी. डी. मडावी, प्रा. शीतल शिंदे, मेघा अंगारखे, डॉ. शीतल गायकवाड, डॉ. वैशाली बोबडे, प्रा. सुवर्णा गेंगजे, सुवर्णा वाघमारे आदींनी पुढाकार घेतला.
......
धाराशिव ः पोलिस अधीक्षक कार्यालयात कायदेविषयक जागृती शिबिरादरम्यान उपस्थित आर. पी. काॅलेजमधील विद्यार्थी आणि पोलिस अधिकारी.
...
फोटो क्रमांक ःOSM26B06925