((((फोटो ः ओव्हरसेट))))
----
(((सीमा गोंटला ः ABD२६J७९३४६)))
(((शिनंदा माळगे ः ABD२६J७९३४७)))
(((आरती कोळकर ः ABD२६J७९३४८)))
---
ABD२६J७९३४९
(((फोटो ओळ))) देवळाई : लंबोदर सोसायटीमध्ये ‘सकाळ’तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत सहभागी महिला.
--
मोदकांच्या गोडव्यात पाककलेला व्यासपीठ
--
‘सकाळ’तर्फे बीड बायपास परिसरातील लंबोदर सोसायटीमध्ये स्पर्धा
--
देवळाई, ता. १५ : गणरायाच्या आगमनाने घरोघरी आनंदाचे वातावरण आहे. घराघरांत मोदकांचा सुगंध दरवळत असून, सणाच्या आनंदाला गोडवा लाभत आहे. या पारंपरिक गोडव्याला स्पर्धेची रंगत आणि महिलांच्या सर्जनशीलतेची जोड मिळाली. ‘सकाळ’तर्फे बीड बायपास परिसरातील लंबोदर सोसायटीमध्ये मोदक स्पर्धा पार पडली. विविध प्रकारचे मोदक तयार करून महिलांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
परीक्षण शेफ राजश्री अग्रवाल यांनी केले. या स्पर्धेत सीमा गोंटला यांनी प्रथम क्रमांक पटकावला. शिनंदा माळगे यांनी द्वितीय, तर आरती कोळकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. मीना कुलकर्णी, सोनाली माळी, मनीषा जोशी, प्रज्ञा गोसावी आणि अमृता बकरे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
विजेत्या तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवणाऱ्या महिलांना ‘मलाबार गोल्ड’तर्फे भेटवस्तू देण्यात आल्या. मातृका वूमन हॉस्पिटलचे पीआरओ दिनेश राठोड आणि गणेश हूड यांच्या वतीने स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिलांना गणपतीच्या फ्रेम भेट म्हणून देण्यात आल्या.
--
तुम्हीही घेऊ शकता स्पर्धेत भाग
ही स्पर्धा १८ वर्षांवरील तरुणी आणि महिलांसाठी आहे. ती तुमच्या गृहनिर्माण सोसायटीच्या प्रांगणात अथवा तेथे उपलब्ध असलेल्या हॉलमध्ये आयोजित केली जाईल. सोसायटीतील महिलांनी यात सहभाग घ्यायचा आहे. त्यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. आपण तयार केलेल्या मोदकांचे परीक्षण करण्यासाठी परीक्षक तेथे उपस्थित राहतील. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ असे बक्षिसांचे स्वरूप आहे. शिवाय विजेत्यांना ‘सकाळ’च्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोफत पास दिले जाणार आहेत. या स्पर्धेच्या आयोजनासाठी ७४१००३०२४५, ७४१००३०२४६ किंवा ८७८८००८३८० या क्रमांकांवर संपर्क साधावा.
----
(((कोट)))
‘सकाळ’ने घेतलेल्या या स्पर्धेमुळे महिलांना एक नवीन व्यासपीठ मिळाले आहे. महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या अशा स्पर्धा नेहमी आयोजित केल्या जाव्यात.
- मनीषा जोशी, सदस्य, लंबोदर सोसायटी