((अँकर)))
---
ABD26J79623 चिखली ई. येथील लाकडी गणेशमूर्ती.
ABD26J79622 कंचली तांडा येथील लाकडी गणेशमूर्ती.
----
चिखली, कंचली तांडा येथे लाकडी गणपती
---
गणेशोत्सवात भाविकांची दर्शनासाठी गर्दी, एकाच कारागिराने घडविल्या मूर्ती
----
शिवणी, ता. १७ (बातमीदार) : किनवट तालुक्यातील सीमाभागातील दोन गावांमधील अनोख्या लाकडी गणपतीची सध्या संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. ६३ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला चिखली (ई.) चा लाकडी गणपती आणि दुसरा आहे चिखलीपासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कंचली तांडा येथील ‘कंचलीचा राजा’. हे दोन्ही गणपती एकाच कारागिराने एकाच लाकडापासून घडवलेले आहेत.तेलंगणा सीमेवरील चिखली (ई.) गावाची लोकसंख्या जवळपास ७०० आहे. येथे १९५९ साली गणपतीची स्थापना करण्यात आली. त्यावेळी गावातील दिवंगत बक्कन्ना झरीवाड, किशन झरीवाड, विठ्ठल झरीवाड, पोषत्ती रुईवाड यांनी पुढाकार घेऊन प्रत्येकी ९० रुपये वर्गणी जमा केली होती. निर्मल (तेलंगणा) येथील प्रसिद्ध कारागीर गुंडप्पा सुतार यांनी झाडाच्या खोडावर आकर्षक कोरीव काम करून ही मूर्ती घडवली. पाळज येथील गणपती मूर्तीही याच कारागिरांनी बनवल्याचे ज्येष्ठ नागरिकांकडून सांगण्यात आले. गेल्या ६३ वर्षांपासून येथे ‘एक गाव एक गणपती’ ही परंपरा कायम आहे. विसर्जनाच्या दिवशी मुख्य लाकडी मूर्ती शेजारी ठेवलेल्या लहान मूर्तीचे विसर्जन केले जाते, तर मुख्य लाकडी मूर्ती पेटीत बंद करून सुरक्षित ठेवली जाते व पुढील वर्षी पुन्हा तिचीच प्रतिष्ठापना केली जाते. येथे दिवाळी-दसऱ्यापेक्षा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. या वर्षी गणेशोत्सवानिमित्त गावकऱ्यांकडून सर्व भाविकांसाठी अकराही दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
----
चौकट
कंचली तांडा येथील ‘कंचलीचा राजा’
चिखलीपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कंचली तांडा येथेही अशाच प्रकारचा अनोखा लाकडी गणपती आहे. या गणरायाची स्थापना वर्ष २०११ मध्ये करण्यात आली. हा गणरायादेखील एकाच लाकडापासून, झाडाच्या खोडावर कोरीव काम करून साकारण्यात आला असून, तो चिखलीच्या गणपतीप्रमाणेच प्रसिद्ध कारागीर गुंडप्पा सुतार यांच्याच हातून घडला आहे. या गणरायाला ‘कंचलीचा राजा’ नावाने ओळखले जाते.