esakal | संपातही सुसाट धावली एसटी 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

संपातही सुसाट धावली एसटी 

sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगाबाद : कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे बुधवारी (ता. आठ) संपाची हाक देण्यात आली होती. या निमित्ताने काढण्यात आलेल्या मोर्चात विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. एसटी महामंडळातील संघटना संपात सहभागी झाल्या नाही, त्यामुळे एसटीच्या सेवेवर काहीही परिणाम झाला नाही. 

केंद्र सरकारच्या कामगार, कर्मचारी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ बुधवारी (ता. आठ) देशव्यापी संपाची हाक देण्यात आली होती. मात्र एसटीचे कर्मचारी या संपात उतरले नाही, त्यामुळे एसटीच्या सेवेवर त्याचा परिणाम झाला नाही. देशव्यापी संपात सीटू, आयटक, इंटक, भारतीय कामगार सेना, श्रमिक महासंघ यासह तीस ते चाळीस संघटना सहभागी झाल्या होत्या. कॉंग्रेस व शिवासेना या संघटना संपात असल्या तरीही कॉंग्रेस प्रणित इंटक आणि शिवसेना प्रणित कामगार सेना या संघटना एसटीमध्ये कार्यरत असतानाही त्यांचे कामगार संपात उतरले नाही. सर्वात मोठी समजली जाणारी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट एसटी कामगार संघटनाही संपात सहाभगी झाली नाही. त्यामुळेच एसटीच्या सेववर काहीही परिणाम झाला नाही. सकाळपासून विभागीतील सर्व बससेवा सुरळीत सुरु होत्या. 

हेही वाचा - दहा महिन्यांच्या बाळांसह ती झाली बेपत्ता, सापडल्यानंतर पतीला म्हणाली...

कामगार सेनेच्या काळ्या फिती 

एस. टी. कामगार सेनेने प्रत्यक्ष संपात सहभाग घेतला नाही. मात्र संपाला पाठींबा म्हणून कामगारांनी काळ्या फिती लावून काम केले. काळ्या फिती लावून संपाला पाठींबा दिल्याची माहिती कामगार सेनेचे अध्यक्ष शिवाजी बोर्डे यांनी दिली. एसटी ही अत्यावश्‍यक सेवेत मोडते, एसटीच्या प्रवाशांना वेठीस धरणे हा उद्देश नव्हता, त्यामुळेच संपात उतरण्याऐवजी पाठींबा दिल्याचे श्री. बोर्डे यांनी स्पष्ट केले. 

अरे बाप रे - धक्कादायक! तो म्हणाला, खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलींसमोर केले असे

एसटीची दहशत 

एसटी कामगारांच्या वेतनवाढीसह विविध मागण्या प्रलंबीत आहेत. यासाठी एसटी कामगारांनी दोन वेळा संप केला, त्यावेळी एसटी महामंडळाने संप मोडीत काढण्याचे पुरेपुर प्रयत्न केले. विषेश म्हणजे संपात सहभागी होता येणार नाही असे परिपत्रक काढले होते. गेल्या वेळीच्या संपातील राज्यातील शंभर पेक्षा अधिक पदाधिकारी व कमगारांवर खटले दाखल केले आहेत. औरंगाबाद विभागात जवळपास दहा कामगारांवर खटले दाखल झालेले आहेत. याच कारणामुळे एसटीचे कर्मचाऱ्यांमध्ये खदखद असूनही प्रत्यक्ष संपात उतरण्याचे धाडस कामगारांनी केले नाही असे कामगार पदाधिकाऱ्यांनी खाजगीत बोलताना सांगीतले. 

loading image
go to top