राज्य वुशू अजिंक्यपद स्पर्धा तसेच निवड चाचणीला खंडपीठाची स्थगिती

राज्य वुशू अजिंक्यपद स्पर्धा तसेच निवड चाचणीला खंडपीठाची स्थगिती
Published on
वुशू अजिंक्यपद स्पर्धेसह निवड चाचणीला खंडपीठाची स्थगिती छत्रपती संभाजीनगर, ता. ४ : पुणे येथे ४ ते ७ सप्टेंबरदरम्यान आयोजित सब-ज्युनिअर, ज्युनिअर आणि सीनिअर राज्य वुशू अजिंक्यपद स्पर्धा तसेच राज्यस्तरीय निवड चाचणीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. नितीन बी. सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब शिंदे यांनी अंतरिम स्थगिती दिली. ​या राज्य अजिंक्यपद स्पर्धेच्या आयोजनाविरोधात खेळाडू सुमीत शिवलिंग खरात, नयन गणेश निर्मल, सेजल संजय तायडे आणि अनुष्का दत्तात्रय जैन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच प्रशिक्षक महेश इंदापुरे यांनी पाठपुरावा केला. ​याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. आशुतोष मिश्रा यांनी युक्तिवाद केला, तर ॲड. विशाल राठोड यांनी साहाय्य केले. त्यांनी संघटनेतील कथित आर्थिक गैरव्यवहार तसेच ‘राष्ट्रीय क्रीडा विकास संहिता, २०११’च्या नियमांचे गंभीर उल्लंघन होत असल्याचा मुद्दा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. राज्यातील तब्बल २३ संलग्न जिल्हा संघटनांनी राज्य संघटनेच्या कारभारावर आक्षेप घेत या स्पर्धेवर बहिष्कार टाकल्याची माहितीही खंडपीठाला दिली. ​याशिवाय, स्पर्धेचे शुल्क कथितरीत्या अधिकृत बँक खात्याऐवजी खासगी यूपीआय खात्यांवर जमा करून घेतल्याचा तसेच सोपान काटके हे एकाच वेळी राज्य संघटना आणि राष्ट्रीय महासंघ या दोन्ही ठिकाणी पदांवर असल्याने ‘हितसंबंधांचा संघर्ष’ निर्माण झाल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला. या सर्व बाबींची गंभीर दखल घेत न्यायालयाने या स्पर्धेला अंतरिम स्थगिती देण्याचा आदेश दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com