ढगफुटीचा कहर कमी करण्यासाठी एक्स बॅंड डॉप्लर रडार, वॉररूमची गरज

महाराष्ट्र ढगफुटीचा प्रदेश बनत आहे. ढगफुटीमुळे जिवित व मालमत्तांचे, शेतीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान कमी करण्यासाठी ढगफुटीच्या शक्यतेची आधी माहिती मिळणे गरजेचे आहे
aurangabad
aurangabadsakal

औरंगाबाद: महाराष्ट्र ढगफुटीचा प्रदेश बनत आहे. ढगफुटीमुळे जिवित व मालमत्तांचे, शेतीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान कमी करण्यासाठी ढगफुटीच्या शक्यतेची आधी माहिती मिळणे गरजेचे आहे. यासाठी विशेषत: मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रासाठी एक्स बॅंड व केए बॅंड फ्रिक्वेन्सीवर कार्यान्वित होणारे डॉप्लर रडार बसवणे आवश्‍यक आहे.

aurangabad
महामार्ग पोलिसांकडून दुचाकीस्वारांना सुचना देवुन जनजागृती;पाहा व्हिडिओ

तसेच महापुरामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी सर्व धरणातील जलव्यवस्थापनासाठी २४ तास वॉर रूम कार्यान्वित करावी लागणार असल्याचे मत हवामानशास्त्रज्ञ व ढगफुटीज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केले आहे. ढगफुटीने होणारे राष्ट्रीय आर्थिक, जिवित हानी, कृषी नुकसान कमी करण्यासाठी रडार, जमिनी लगतची माहिती व सॅटेलाईट डाटा यांचे रियल टाईम पृथक्करण करून महाराष्ट्रातील ४३ हजार ७२२ गावांतील जनतेला लोकांना थेट मोबाईलवर ढगफुटी, गारपीट, किती मिलिमीटर पाऊस किती वाजता कोणत्या अक्षांश रेखांश वर होणार याची रियल टाईम माहिती देता येणे शक्य आहे.

जागतिक हवामान संघटनेने भारताची नेमनुक आशिया खंडातील देशांना ढगफुटींची अधिकृत सुचना देण्यासाठी 'नोडल एजन्सी' म्हणून करून आता जवळपास तीन वर्षे होतील व सहा तास आधी भारत इतर देशांना ढगफुटींची अधिकृत सुचना देतो तशी ती भारतातील शेतकऱ्यांना दिल्यास कृषीक्षेत्रासाठी उपयुक्त ठरेल व देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात भर पडेल असा दावा आयआयटीएम पुणेचे माज शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सकाळशी बोलताना केला.

तर सहा तास मिळेल आधी पुर्वसूचना

एक्स बॅंड व केए बॅंड फ्रिक्वेन्सीवर कार्यान्वित होणारे डॉप्लर रडार बोटाच्या पेरा एवढ्या लहान आकारमानात किती पाणी, बर्फ कण व बाष्प आहे याची माहिती देते. यावरून ढगाच्या एकूण आकारमानानुसार ढगात किती द्रवरूप पाणीघटक आहे , ढगफुटी कोणत्या अक्षांश व रेखांशावर हा भार किती तीव्रतेची असेल व नेमकी वेळ कोणती असेल याची अचूक माहिती मिळते.

अन्य देशातही हेच तंत्र वापरले जाते जे जगातले अद्यावत तंत्रज्ञान असून आपल्या देशात उपलब्ध आहे. ज्या आधारे शेती, जनावरे, मालमत्ता व जिवितहानी टाळणे शक्य आहे. कारण सहा तास कमीत कमी आधी खात्रीशीर माहिती सुयोग्य पद्धतीने डॉप्लर रडार वापरल्यास मिळू शकते. असे चार रडार उपलब्ध आहेत. या शिवाय गोवा येथील रडार कोकण व पश्चिम महाराष्ट्रात अचुक माहिती देत असल्याचे प्रा. जोहरे यांनी सांगीतले.

गेल्या मंगळवारी (ता. सात ) मराठवाड्यात या मंडळात झाली ढगफुटी (कंसात झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये)

खानापूर (नांदेड) (१७३), आंबड (जालना) (१५६), माळाकोळी (१५६), पाथरी (परभणी) (१५३), चापानेर (१५०), गंगाखेड (१४२), कलंबर (१३७), पूर्णा (१३४), रामतीर्थ (१३३), माजलगाव (१३०), मुखेड (१२९), औरंगाबाद (१२८), पालम (१२४), आदमपूर (१२३), खुलताबाद (१२०), पिशोर (११७), कन्नड (११६), जाहुर (११४), लोहगाव (११२), करंजखेडा (११२), येवती (१११), देवगाव (११०), रंगारी (११०), नरसी (१०९), शाहापूर (१०८), कुरुळा (१०७), वैजापूर (औरंगाबाद) (१०७), चांडोळा (१०६), वाडवणी (बीड) (१०५), बिलोली (नांदेड) (१०५), धालेगाव (परभणी) (१०२), दिग्र बुद्रुक (१००), अहमदपूर (लातूर) (१००) , अजिंठा (१००), चिकलठाण (१००), पाचोड (१००), उटवद (जालना) (१००), परतूर (१००), आष्टी (१००), घनसावंगी (१००) , नाचनवेल (१००), हिंगोली जिल्हा (१००) ,

जोहरे यांनी सूचवलेली पंचसूत्री

० एक्स बॅंड व केए बॅंड फ्रिक्वेन्सीवर कार्यान्वित होणारे डॉप्लर रडार बसवणे.

० महाराष्ट्रातील ४३ हजार ७२२ गावांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग बेस्ड पर्जन्यमापक बसविणे आवश्यक.

० महापूराने होणारी जिवित व वित्तहानी टाळण्यासाठी २४ बाय ७ चालणारी वॉररूम बनविणे. हवामान, पाऊस व ढगफुटी गारपीट आदी अलर्ट नुसार धरणातील पाण्याचे जलव्यवस्थापन करने व यासाठी हवामान शास्त्रज्ञ तसेच जलसंपदा विभागाचे २४ तास माहितीचे तालुकास्तरावर नियोजन

० महाराष्ट्रातील प्रत्येक नागरीकांच्या मोबाईल वर अंदाज नव्हे तर अचूक माहिती व अलर्ट अक्षांश रेखांश नुसार रियल टाईम व कस्टमाईज मिळण्याची व्यवस्था कार्यान्वित करणे.

० राज्यांना जोडलेल्या केंद्रीय आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाची अथवा मंडळाची स्थापना करून कृतीशील कार्यक्रमांची अंमलबजावणी करावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com