यिन लोगो
लातूर ः ‘सकाळ’ यिनच्यावतीने एमआयडीसी परिसरातील मुलींचे निरीक्षण गृहात ‘माणुसकीची दिवाळी’ साजरी करण्यात आली. यावेळी यिनचे सदस्य.
माणुसकीच्या दिव्यांनी उजळली वंचित मुलांची दिवाळी!
-
लातूर शहरात ‘सकाळ’ यिनच्या सदस्यांनी घेतला पुढाकार
-----
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ३ ः दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण. मात्र, समाजातील काही घटक या आनंदापासून वंचित राहतात. अशा मुलांच्या आयुष्यातही दिवाळीचा आनंद फुलविण्याच्या उद्देशाने येथील ‘सकाळ’ यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) कोअर टीमच्या वतीने एमआयडीसी परिसरातील मुलींचे निरीक्षण गृह व बालगृह येथे ‘माणुसकीची दिवाळी’ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत यिनच्या सदस्यांनी स्वतःच्या घरी तयार केलेले विविध फराळाचे पदार्थ तसेच कमी आवाजाचे फटाके मुलांना भेट देऊन त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा केला. सण-उत्सवांचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू आणि वंचित घटकांपर्यंत पोचविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्या उत्साहातून या उपक्रमाचे समाधान व्यक्त झाले. सामाजिक बांधिलकी जपत माणुसकीचा प्रकाश प्रत्येकाच्या आयुष्यात पोचावा, हाच संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी मुलींचे निरीक्षणगृहाचे सागर मलवाडे, चैताली येळने, यिन कोअर टीमचे दीप्ती पिंपरे, प्रतिभा भिसे, अंकिता गिरी, प्रशांत सूर्यवंशी, स्वस्ती मानकोसकर, आकाश हिप्पाळे, शांतनू दैतने, हरिशकुमार चांडक, श्रीकांत स्वामी, सिद्धी शर्मा, श्रद्धा कसबे, सृष्टी मोरे, वैष्णवी सवाशे, गीता चव्हाण, समर्थ शिंदे, उत्कर्षा चव्हाण, स्वप्निल धायगुडे उपस्थित होते.
‘यिन’च्या उपक्रमात व्हा सहभागी
‘सकाळ’ यिनच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत. यिनच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी यिन अधिकारी अमर साखरे यांना संपर्क साधावा (९६६५१२८८७१).
----