उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत
रविवारी योगिक महासंमेलन
----
नांदेड, ता. २९ ः श्री विराट विश्वकर्मा बहुउद्देशीय संस्था अंतर्गत नांदेड योग सेवा समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि १०८ श्री वेदांतचार्य दिगंबर स्वामी महाराज (वसमत) यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (ता. एक) सकाळी ५ ते ८ या वेळेत अनिल लॉन्स निळा रोड, नांदेड येथे योगिक महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. योगाचार्य नांदेड योगरत्न भूषण सीताराम गुरुजी यांच्या मार्गदर्शनात सकाळी ५ ते ८ या वेळेत अनिल लॉन्स निळा रोड, नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी आमदार बालाजी कल्याणकर असणार आहेत.
या महासंमेलनास पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, प्र-कुलगुरू डॉ.अशोक महाजन, पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे, शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे, योगगुरू अरविंद जाधव, ज्येष्ठ पत्रकार शंतनू डोईफोडे, केशव घोणसे पाटील, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पांडागळे, उद्योजक अनिल शेटकार, नारायण पावडे, श्रेणिक नागडा, भारत रामीणवार यांची उपस्थिती राहणार आहे. या महासंमेलनात नांदेड योग सेवा समिती अंतर्गत शहरात चालणाऱ्या विविध १४ ते १५ शाखा अंतर्गत १०० अशा आदर्श शिक्षक व आदर्श योग साधकांना आरोग्य रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या योगिक महासंमेलनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड योग सेवा समितीच्या वतीने करण्यात आले.