Young Farmer Success : नागद येथील तरुण शेतकरी प्रदीप ठाकरे यांनी दीड एकरात उत्पादन घेतलेल्या टिश्यू कल्चर केळीची १५ टनांची खेप थेट इराणमध्ये निर्यात केली.
नागद : कन्नड तालुक्यातील नागद येथील शेतकरी प्रदीप सुधाकर ठाकरे यांनी बोरमळी शिवारात दीड एकरात टिश्यू कल्चर केळी रोपांची जुलै महिन्यात लागवड केली. ही केळी आता इराणच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविण्यात आली आहेत.