
कन्नड : तालुक्यातील बहिरगाव येथील रवींद्र बनकर या तरुण शेतकऱ्याने अनोखा प्रयोग केला आहे. थायलंड देशातील रेड थाई या ॲपल बोराची एक हजार रोपे आणून तीन एकर क्षेत्रात १० बाय १२ अंतरावर त्याची लागवड केली. तालुक्यात इतर ॲपल बोरांच्या वाणाची लागवड आहे. परंतु, या रेड थाई ॲपल बोराची वाणाचा तालुक्यात प्रथम लागवडीचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे बनकर यांनी सांगितले.