Sambhajinagar Crime News : मारहाणीत जखमी युवकाचा मृत्यू; जुन्या वादातून रांजणगाव शेणपुंजी येथील घटना
Youth Dies in Village Attack : राजणगाव शेणपुंजी येथील एकतानगर परिसरात जुन्या वादातून २६ मे रोजी एका युवकावर प्राणघातक हल्ला झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने खुनासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बजाजनगर : राजणगाव शेणपुंजी येथील एकतानगर परिसरात जुन्या वादातून सोमवारी (ता.२६) रात्री साडेआठच्या सुमारास एका तरुणाला बेदम मारहाण झाली. त्याचा बुधवारी (ता. २८) उपचारादरम्यान मृत्यू झाला.