Road Accident: आळंदमध्ये अपघातातील जखमी विशाल थोरातचा उपचारादरम्यान मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा ढिगारा
Accident News: आळंद येथे आठ ऑगस्टला झालेल्या अपघातानंतर १९ वर्षीय विशाल भागवत थोरातचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. युवक जेसीबी मशीन चालवत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.
आळंद : येथील विशाल भागवत थोरात (वय १९) याचा उपचारादरम्यान शनिवारी (ता. २३) मृत्यू झाला. आठ ऑगस्टला रात्री मांगीरबाबांच्या दर्शनावरून परतताना मंगळूर फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तो गंभीर जखमी झाला होता.