Crime News : बहिणीसोबत शेवटच्या गप्पा; फोटोग्राफर तरुणाने तलावात उडी घेत संपवले जीवन
Mental Health : हर्सूल तलावात सोमवारी सकाळी एक छायाचित्रकार तरुण मृतावस्थेत आढळून आला. आर्थिक ओढाताणी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर त्याने हे पाऊल उचल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
हर्सूल : उन्हाळी सुटीमुळे माहेरी आलेल्या बहिणीसोबत गप्पा मारून बाहेर पडलेल्या छायाचित्रकार तरुणाचा मृतदेह सोमवारी (ता. १२) सकाळी हर्सूल तलावात आढळून आला. सोहम नानासाहेब उगले (२५, रा. देवळाई चौक परिसर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.