
छत्रपती संभाजीनगर : ‘विकसित महाराष्ट्र @२०४७’ या अभियानांतर्गत उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे ‘महाराष्ट्राच्या भविष्याला आकार देण्यासाठी तुमचा आवाज महत्त्वाचा’ या सूत्रानुसार नागरिक, विद्यार्थी, उच्चशिक्षित नोकरदार यांचे नागरी सर्वेक्षण आयोजित केले आहे. १७ जुलैपर्यंत सुरू असलेल्या या सर्वेक्षणात अभिप्राय नोंदवण्यासाठी महाविद्यालयांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे जनजागृती करण्यात येत आहे.