धाराशिवमध्ये २७ रोजी रंगणार जिल्हास्तरीय युवा महोत्सव

धाराशिवमध्ये २७ रोजी रंगणार  जिल्हास्तरीय युवा महोत्सव
Published on: 
शुक्रवारी जिल्हास्तरीय युवा महोत्सव ‘नशामुक्त युवा-विकसित भारतासाठी’वर सांस्कृतिक स्पर्धा सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. १९ ः क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली ‘नशामुक्त युवा - विकसित भारतासाठी’ या मुख्य संकल्पनेवर आधारित जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२६-२७ चे आयोजन करण्यात आले आहे. विकसित भारत नेतृत्व संवाद अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने शुक्रवारी (ता. २७) हा महोत्सव होईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी यात सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सांस्कृतिक स्पर्धांअंतर्गत विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. समूह लोकनृत्य, समूह लोकगीत व पथनाट्य आणि कविता लेखन व चित्रकला स्पर्धांत जिल्हास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांकास पात्र ठरणारे संघ विभागीय स्पर्धेसाठी जातील, तर राष्ट्रीय स्तरावरील महोत्सव १० ते १२ जानेवारी २०२७ दरम्यान नवी दिल्ली येथे होणार आहे. सहभागी युवकांचे वय १५ ते २९ वर्षांच्या दरम्यान असावे, युवक जिल्ह्यातील रहिवासी किंवा येथे शिक्षण घेत असावा, तसेच एका युवकास केवळ एकाच स्पर्धेत सहभागी होता येईल, व्हीबीवायएलडी-२०२६ मध्ये राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेले युवक या स्पर्धेसाठी पात्र असणार नाहीत. इच्छुकांनी https://forms.gle/fdEVMwRqZDPhDe4y5 या लिंक किंवा माय भारत पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. नावनोंदणी विहित नमुन्यातील अर्जासह २३ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, धाराशिव येथे प्रत्यक्ष किंवा districtsports.osmanabad@gmail.com या ईमेलवर पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.