युवक महोत्सवात तेरणाची मिमिक्री, पखवाज वादनात पदकांवर मोहर

युवक महोत्सवात तेरणाची मिमिक्री,  पखवाज वादनात पदकांवर मोहर
Published on
((अँकर)) ............. युवक महोत्सवात ‘तेरणा’ची मोहर मिमिक्री, पखवाज वादनात पटकावले पारितोषिक सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. ३ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने कळंब येथील शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय युवक महोत्सवात तेरणा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांची छाप सोडत पदकांवर मोहर उमटविली. महोत्सवात तेरणा महाविद्यालयाचा बीसीए तृतीय वर्षाचा विद्यार्थी ऋषीकेश रणशूर याने मिमिक्री कलाप्रकारात तृतीय पारितोषिक पटकावले. तर बी.ए. तृतीय वर्षातील ओमकार मुळे याने भारतीय तालवाद्य (पखवाज वादन) प्रकारात द्वितीय पारितोषिक मिळविले. या दोन्ही विजेत्या विद्यार्थ्यांची थेट केंद्रीय युवक महोत्सवासाठी निवड झाली आहे. याशिवाय महाविद्यालयाच्या १० विद्यार्थ्यांच्या संघाने सादर केलेल्या वारकरी दिंडी लोकनृत्यास उपस्थितांनी उभे राहून दाद दिली. या यशाबद्दल तेरणा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, युवा नेते मल्हार पाटील, प्राचार्य डॉ. डी.बी. मोरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, संघ व्यवस्थापक डॉ. अनघा तोडकरी व मार्गदर्शक प्राध्यापकांचे कौतुक केले. .......... धाराशिव ः जिल्हास्तरीय युवक महोत्सवात वारकरी दिंडी लोकनृत्य सादर करताना तेरणा महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांचा संघ. ... फोटो क्रमांक ः OSM26B06901

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com