Knife Attack : तरुणावर रिक्षाचालकाचा चाकूहल्ला; आला होता परीक्षेसाठी, छावणीतील पहाटेची घटना
Crime News : छावणी परिसरात परीक्षेला जाणाऱ्या तरुणावर अज्ञात रिक्षाचालकाने चाकूहल्ला केला. ही घटना बुधवारी पहाटे होली क्रॉस शाळेजवळ घडली असून, तरुण गंभीर जखमी झाला आहे.
छावणी : परीक्षेला जाणाऱ्या तरुणावर रिक्षाचालकाने चाकूहल्ला करून गंभीर जखमी केले. हा प्रकार बुधवारी (ता. चार) पहाटे साडेतीनच्या सुमारास होली क्रॉस शाळेजवळ घडला. या प्रकरणात छावणी पोलिस ठाण्यात अनोळखी रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा नोंद झाला.