Sambhajinagar Firing : जुन्या वादातून गोळीबार; मित्रावर झाडल्या तीन गोळ्या, जखमीवर घाटीत उपचार सुरू
Sambhajinagar Firing Case : गंगापूर तालुक्यात जुन्या वादातून मित्राने गावठी पिस्तुलातून गोळीबार करत तीन गोळ्या झाडल्या. यात युवक गंभीर जखमी असून घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गंगापूर : जुन्या वादातून एका मित्राने गावठी पिस्तुलामधून गोळीबार केला. यात एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी (ता. पाच) गंगापूर-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील चहाच्या दुकानावर घडली.