येडशीत ‘सामूहिक पंचनामे’; ३५ ते ४० टक्के काम पूर्ण

येडशीत ‘सामूहिक पंचनामे’;  ३५ ते ४० टक्के काम पूर्ण
Published on: 
येडशीत ‘सामूहिक पंचनामे’; ३५ ते ४० टक्के काम पूर्ण येडशी, ता. ३ (बातमीदार) ः यंदाच्या कडक दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांची झालेली राखरांगोळी आणि चाऱ्या-पाण्याच्या टंचाईने कोलमडलेला बळीराजा आता शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसला आहे. या पार्श्वभूमीवर येडशी शिवारात प्रशासनाकडून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सामूहिक पंचनामे करण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले असून, आतापर्यंत सुमारे ३५ ते ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. येडशी येथील ग्राम महसूल अधिकारी भातभागे, ग्रामपंचायत अधिकारी मटके आणि कृषी सहायक देवकर यांच्या संयुक्त पथकाने स्थानिक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. उर्वरित शिवारातील पंचनाम्याचे कामही येत्या काही दिवसांत तातडीने पूर्ण केले जाईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. ‘पंचनामे कागदावर नको, बांधावरच व्हावेत’ शासकीय प्रतिनिधींनी पाहणी करून आठ दिवस उलटले तरीही पुढील मदतीबाबत स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दुष्काळामुळे शेतातील पिके तर करपली आहेतच, शिवाय चाऱ्याअभावी आणि पाण्याअभावी पशुधनाचा सांभाळ करणेही कठीण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ कागदोपत्री सोपस्कार न ठरवता प्रत्यक्ष बांधावर जाऊनच पारदर्शक पंचनामे करावेत आणि नुकसानीचे पुरावे तातडीने शासनाकडे पाठवून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित मदत जमा करावी, अशी मागणी येडशीतील शेतकऱ्यांनी केली. .... येडशी ः येथील शिवारात प्रत्यक्ष पिकात जाऊन सामुहिक पंचनामे करण्यात येत आहेत. पंचनाम्यावेळी उपस्थित महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी. फोटो क्रमांक ःOSM26B07122

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com