कामांसाठी जिल्हा परिषद सभापती मागतायत टक्केवारी, इम्तियाज जलील यांचा आरोप

टक्केवारी वरुन जिल्हा परिषदेचे सभापती किशोर बलांडे व खासदार इम्तियाज जलील समोरासमोर
Imtiaz Jaleel
Imtiaz Jaleelesakal

औरंगाबाद : जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ५०:५४ अंतर्गत येणाऱ्या जनसुविधांच्या कामासाठी जिल्हा परिषदेचे सभापती किशोर बलांडे हे पाच टक्के मागत आहे, असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विटर करुन केला आहे. पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्याचे वार्षिक नियोजन केले आहे. जिल्हा नियोजनअंतर्गत जिल्हा परिषदेसाठी १५६ कोटींचे नियोजन करण्यात आले. या अंतर्गत ५०:५४ च्या कामांसाठी ५४ कोटींचा निधी सभापती किशोर बलांडे यांनी मंजूर करून घेतला आहे. (Zilla Parishad Committee President Demand Percentage For Works, Imtiaz Jaleel Allegation)

Imtiaz Jaleel
Aurangabad : औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर कारच्या धडकेत बापलेक गंभीर जखमी

मंजूर केलेल्या निधीमधून खासदार इम्तियाज जलील यांनी सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या मतदारसंघामधील कामासाठी साडेआठ कोटींचा प्रस्ताव किशोर बलांडे यांच्याकडे सादर केला आहे. परंतु सभापती बलांडे यांनी खासदार यांना केवळ पन्नास लाखांच्या कामांचा प्रस्ताव मंजूर झाल्याचे सांगितले. यावर खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) व सभापती यांच्या चांगली शाब्दिक खडाजंगी झाली. यावर ५० लाखांचा निधी पालकमंत्र्यांनी मंजुरी केलेला असल्याचे सभापती बलांडे यांनी इम्तियाज जलील यांना सांगितले. यावर सभापती यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. तसेच जिल्हा परिषद सदस्यांना दोन कोटी असा निधी वाटप करण्यात येत आहे, आणि खासदारला ५० लाखांचा निधी मंजूर केल्यामुळे खासदार यांनी मुख्यमंत्र्यांना ट्वीट करून नाराजी दर्शवली आहे.

जिल्हा परिषदेला टक्केवारीची कीड

जिल्हा परिषदेला टक्केवारीची कीड ही नवीन नसून गेल्या अनेक वर्षांपासून जनसुविधांच्या कामासाठी येणारा निधी हा टक्केवारी घेतल्याशिवाय खाली वितरीत होत नाही. यावर कोणाचे नियंत्रण व वचक नसल्यामुळे हा कारभार सर्रासपणे सुरू असतो परंतु खासदार इम्तियाज जलील यांनी सोमवारी ट्विट करत हा प्रकार समोर आणला आहे. तसेच हा एका विभागाचा नसून सर्वत्र अशी टक्केवारी मागणी मागितली जात असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी 'सकाळ'ची बोलताना केला.(Aurangabad)

Imtiaz Jaleel
Osmanabad Bank| जिल्हा बँकेत महाविकास आघाडी सत्तेत, पण गद्दारी झाली कुठे ?

नियोजन करा

दरम्यान जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ २१ मार्चला संपत आहे. यामुळे लवकरात-लवकर नियोजन करणे अपेक्षित आहे. परंतु जिल्हा परिषदेच्या वतीने अद्याप नियोजन झालेले नाही. त्यामुळे जिल्हा नियोजनाचा निधी तात्काळ खर्च करावा असे मुख्य लेखा व वित्त अधिकारी आप्पासाहेब चाटे यांनी सर्व विभाग प्रमुख यांना पत्र दिले आहे.

खासदार इम्तियाज जलील यांच्या कोणत्याही कामाचे प्रस्ताव माझ्यापर्यंत आलेले नाहीत. त्यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ट्विट केले आहे.

- किशोर बलांडे, सभापती वित्त व बांधकाम, जिल्हा परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com