

Election Commission to announce ZP elections
esakal
छत्रपती संभाजीनगर - राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांचा जोर चढलेला असतानाच आता ग्रामीण भागातील राजकारण तापवणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
आरक्षणाच्या पेचामुळे रखडलेल्या या निवडणुकांबाबत निवडणूक आयोग सक्रिय झाला असून, येत्या दोन ते तीन दिवसांत अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.