औरंगाबादच्या हर्षदा निठवेला शिवछत्रपती पुरस्कार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

  • हर्षदा सदानंद निठवेच्या यशाची राज्य सरकारने घेतली नोंद
  • सागर कुलकर्णी, अमेय जोशीलाही थेट पुरस्काराची घोषणा 
  • आट्यापाट्या या देशी खेळात उस्मानाबादच्या मुलीची बाजी

औरंगाबाद : खेलो इंडियाच्या 10 मीटर एअर पिस्तुल गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या औरंगाबादकर हर्षदा सदानंद निठवेच्या यशाची राज्य सरकारने नोंद घेत, नेमबाजीतील यंदाचा शिवथत्रपती पुरस्कार तिला देऊ केला आहे. औरंगाबादचेच जिमनॅस्टिक जगतात यश मिळवणारे अमेय जोशी आणि सागर कुलकर्णी यांनाही 2017-18 सालचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहिर झाला आहे. 

राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन बुधवारी (ता. 13) 2017-18 सालच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली आहे. यंदा पुण्याच्या बालेवाडीतील क्रीडा संकुलात झालेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेच्या 10 मीटर पिस्तुल गटात सुवर्णवेध घेणाऱ्या औरंगाबादच्या हर्षदा निठवेला यंदाचा नेमबाजीतील विछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे.

जिम्नॅस्टिक खेळाच्या माध्यमातून औरंगाबादच्या वाट्याला शिवछत्रपती पुरस्कार आले आहेत. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील प्रशिक्षण केंद्राचे खेळाडू आणि अनेक खेळाडू घडवणारे अमेय जोशी आणि सागर कुलकर्णी यंदाही या वेळीचा थेट पुरस्कार क्रीडा मंत्रालयातर्फे जाहिर करण्यात आला आहे. 

मराठवाड्याला अजुन दोन पुरस्कार :
क्रीडा मंत्रालयातर्फे दिला जाणारा आणि राज्याच्या क्रीडा विश्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार मिळवण्यात मराठवाड्यातील अजुन दोन जणांना यश आले आहे. आट्यापाट्या या देशी खेळात उस्मानाबादच्या गंगा सागर शिंदे या मुलीने तर बॅडमिंटन या खेळात बीडच्या अक्षय प्रभाकर राऊत हा मुलगा यंदाच्या शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabads Shiv Chhatrapati Award goes to Harshada Nithavela